विषमुक्त अन्नधान्य पिकवून कुटुंबाला सुदृढ बनवा- गंगाधर जिभकाटे  

विषमुक्त अन्नधान्य पिकवून कुटुंबाला सुदृढ बनवा- गंगाधर जिभकाटे  

Ø भंडारा येथे कृषी दिन उत्साहात

भंडारा, दि. 1 : स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या कृषी दिनानिमीत्त बळीराजाने विषमुक्त अन्नधान्य पिकवून स्वतःच्या कुटुंबासह सर्वांनाच विषमुक्त अन्नधान्य पिकवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर जीभकाटे यांनी केले.

भंडारा जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा जिल्हा परिषद भंडाराचे उपाध्यक्ष संदीप ताले, जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी पी. एम. चौधरी, कृषी विकास अधिकारी विश्वजीत पाडवी, मोहीम अधिकारी व्ही. एम. चौधरी, कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेश सेलोकर, आरोग्य सभापती रमेश पारधी, महिला व बालकल्याण सभापती स्वाती वाघाये, समाज कल्याण सभापती मदन रामटेके, कृषी समिती सदस्य बंडू बनकर, रजनीश बनसोड, दीपलता समरित, रसिका रंगारी, पूजा हजारे,कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने, देवानंद चौधरी, शेषराव निखाडे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक अरुण बलसाने यांनी कृषी विभागाच्या विविध योजना सेंद्रिय शेती व आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादनात वाढ करण्याविषयी मार्गदर्शन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. चौधरी यांनी जिल्हा परिषद कृषी विभाग विभागाच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. कीटक शास्त्रज्ञ डॉ. उंबरकर यांनी भातवळी भाजीपाला पिकावर येणाऱ्या कीड रोगाबाबत उपाययोजना मार्गदर्शन केले. यावेळी कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधनी यांनी सेंद्रिय शेती व प्रत्यक्षात सेंद्रिय शेती कशी फायदेशीर आहे, हे सांगितले. संचालन मोहीम अधिकारी व्ही. एम. चौधरी यांनी केले. तर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.