राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रम २०२२

राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रम २०२२

आज दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातल्या हरितक्रांतीचे प्रणेते मा.स्व. वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन मा.आयुक्त, कृषि श्री. धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पद्मश्री सभागृह, मध्यवर्ती इमारत, कृषि आयुक्तालय, पुणे येथे करण्यात आले होते.

राज्यस्तरीय कृषि दिन कार्यक्रमास मा.आयुक्त, कृषि श्री. धीरज कुमार(भा.प्र.से.), मा.श्री. विकास पाटील, संचालक (विस्तार व प्रशिक्षण), मा.श्री. सुभाष नागरे, संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन), मा.श्री. दिलीप झेंडे, संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण),मा.श्री.शिंदे,सहसंचालक, मा श्री ननावरे, सहसंचालक तसेच कृषी आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अन्न प्रक्रिया उद्योगातील ६ यशस्वी महिला उद्योजिका श्रीमती मनिषा दिपक राऊत, श्रीमती संगिता विजय बागुल, श्रीमती शितल किरण डोखळे, श्रीमती स्‍नेहा दिपक कासार,श्रीमती अर्चना संपत दाभाडे, श्रीमती शोभा रमेश राठोड या उपस्थित होत्या. तसेच पौष्टीक तृणधान्याचे अधिक उत्पादन घेणारे शेतकरी श्री. अजित लक्ष्‍मण भांगरे, श्री. लक्ष्‍मण गोपाल बरफ, श्री. कैलास तुकाराम भांगरे, श्री. वामन चाहू शिंगवा उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा.आयुक्त, कृषि महोदयांचे आगमन झाल्यानंतर मा.स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. संचालक (विस्तार व प्रशिक्षण) श्री. विकास पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी कृषि विभागामार्फत खरीप हंगाम २०२२ यशस्वी करण्याकरिता तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि.२५ जून २०२२ ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत आयोजित कृषि संजिवनी मोहिमेबाबत माहिती दिली. कृषि संजिवनी मोहिमेची सांगता दि. १ जुलै २०२२ रोजी कृषि दिन कार्यक्रमाने होत असल्याचे सांगून कृषि विस्तार कार्यामध्ये विभाग करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली. असून कृषिदिनाचे महत्व सांगितले. त्यानंतर कृषि संजिवनी मोहिम-२०२२ विषयीची चित्रफित दाखविण्यात आली. मा. संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) श्री. दिलीप झेंडे यांनी कृषि विभागामार्फत आयोजित ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम, बीजप्रक्रिया मोहीम,उगवणक्षमता तपासणी मोहीम,खतांचा संतुलित वापर याबाबत मार्गदर्शन केले. मा. संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) श्री. सुभाष नागरे यांनी कृषिप्रक्रिया क्षेत्रामधील राज्याच्या प्रगतीबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमामध्ये मा.आयुक्त, कृषि यांचे हस्ते अन्न प्रक्रिया उद्योगातील यशस्वी महिला उद्योजिका व पौष्टीक तृणधान्याचे अधिक उत्पादन घेणा-या शेतक-यांना सन्मानित करण्यात आले.श्री.अजित लक्ष्‍मण भांगरे व श्रीमती मनिषा दिपक राऊत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच शेतकरी मासिकाच्या  कृषि प्रक्रिया व मूल्यवर्धन आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्तच्या विशेषांकांचे विमोचन करण्यात आले. शेतकऱ्यांना परसबाग बियाणे कीट वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमामध्ये मा. आयुक्त कृषि यांनी शेतक-यांना आपले मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कृषि विभागाकडील विविध संजिवनी उपक्रम शेतकरी व शेती संबंधीत प्रक्रीया उद्योजक यांचेपर्यंत पोहचवून कृषि क्षेत्रामध्ये विकास होणेसाठी कृषि विभागाच्या सर्व यंत्रणांनी कायमस्वरूपी प्रयत्न सुरु ठेवणेच्या सुचना दिल्या. तदनंतर मा. श्री. ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करणेत आली.

तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि. २५ जुन २०२२ ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कृषि संजीवनी मोहिमेची सांगताही कृषि दिन कार्यक्रमाने करण्यात आली. कृषि संजिवनी मोहिम दि. २५ जुन २०२२ ते ०१ जुलै २०२२ या कालावधीत विविध कार्यक्रम, सभा, वेबिनार, चर्चासत्र, प्रशिक्षण प्रात्यक्षिक याच्या माध्यमातून कृषी विभागातील २९७२० अधिकारी व कर्मचारी, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्राचे १५२० शास्त्रज्ञ, ४४६१५ लोकप्रतिनिधी, रिसोर्स बँकेतील शेतकरी व ८००२५ इतर प्रगतीशील शेतकरी या सर्वांच्या सहभागातून एकूण १०९१०६० शेतकरी बांधवांना प्रशिक्षित करण्यात आले. कृषि संजिवनी मोहिमेंतर्गत एकूण ३६३३८ गावांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

(विकास पाटील ) कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण)   कृषि आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,पुणे