भंडारा : 15 ते 30 जुलै दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा

15 ते 30 जुलै दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवडा

भंडारा, दि.16:- जिल्ह्यातील अर्भक व बाल मृत्यूदर कमी करणे हे आरोग्य अभियानाचे एक महत्वाचे उद्दिष्ट असून देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण आहे. दहा टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. अतिसारामुळे बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळा व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून जिल्ह्यात 15 ते 30 जुलै 2021 या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत आहे.

            विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्यामध्ये अतिसार असलेल्या बालकांमध्ये ओआरएस आणि झिंकच्या वापराबाबतचे प्रमाण जास्तीत जास्त होईल याची सुनिश्चिती करणे. सामाजिक व आरोग्य संस्था स्तरावर बालकांमधील अतिसाराच्या रुग्णांचे व्यवस्थापन स्टॅडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल नुसार होत असल्याबाबतची खात्री करण्यात येणार आहे. या उपक्रमात जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करावयाचा याची प्रात्याक्षिके, आशा यांच्या माध्यमातून ओआरएस झिंक या गोळ्यांचे घरोघरी वाटप, अतिसार झालेल्या बालकांचा शोध व उपचार करण्यात येणार आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.