सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची  माहिती सादर करण्याचे आवाहन

सार्वजनिक व खाजगी आस्थापनांनी मनुष्यबळाची

 माहिती सादर करण्याचे आवाहन

  चंद्रपूर दि. 9 जुलै : जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची स्त्री-पुरुष व एकूण अशी सांख्यिकी माहिती विहित नमुना ईआर-1 मध्ये सादर करावी. सदर माहिती प्रत्येक तिमाहीस, विषयाकिंत कायद्यातील तरतुदीनुसार नियमितपणे शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानूसार जून 2021 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर 1 मधील त्रैमासिक सांख्यिकी  माहिती  संकलनाचे  काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयाद्वारे ऑनलाईन पद्धतीने चालू असून सर्व आस्थापनांकडून  100 टक्के प्रतिसाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सदरील जून 2021 अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 आहे. तिमाही विवरणपत्र विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे व कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे. तसेच प्रत्येक आस्थापनेने नोंदणी तपशील, आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्ययावत करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडून यापूर्वीच युजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत. त्याचा वापर करून प्रत्येकाने या विभागाच्या संकेतस्थळावर लॉगिन करून आपली अचूक माहिती ऑनलाइन पद्धतीने सादर करावी.

यासंदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा  माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com किंवा asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in यावर उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशिलासह संपर्क साधावा. असे कळविण्यात आले आहे.