दिव्यांग व्यक्ती आणि एकल महिलांना पर्यावरणीय शेती आणि पौष्टिक परसबाग लागवड प्रशिक्षण.

दिव्यांग व्यक्ती आणि एकल महिलांना पर्यावरणीय शेती आणि पौष्टिक परसबाग लागवड प्रशिक्षण.

आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचा नाविन्यपूर्ण उपक्रम.

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)

कुरखेडा:-
आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचा नाविन्यपूर्ण उपक्रम. दिव्यांग व्यक्ती आणि एकल महिलांना पर्यावरणीय शेती आणि पौष्टिक परसबाग लागवड प्रशिक्षण देऊन सेंद्रिय शेती आणि विषमुक्त आहार यासंदर्भात केले जागरूक. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा विचार करता प्रशिक्षणात सनीटाझर, माक्स, तसेच कोरोना बद्दलच्या असलेल्या गैरसमज याबद्दल माहिती देऊन लस घेण्यास प्रवृत्त करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले, यामध्ये कोरची, कुरखेडा, आरमोरी आणि वडसा या चार तालुक्यातील ३६५ दिव्यांग व्यक्ती आणि १३५ एकल महिलांनी एकूण ५०० लोकांनी फार मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रशिक्षणाचे धडे गिरविले
या प्रशिक्षणाला दिनांक २५ जून २०२१ला महात्मा गांधी सभागृह कुरखेडा, दिनांक २५ जून २०२१ ला ग्रामपंचायत वैरागड, दिनांक २६जून २०२१ ला सावंगी, दिनांक २७ जून २०२१ ला ग्रामपंचायत सोनेरांगी, दिनांक २७ जून २०२१ ला आकाश विद्यालय मोहझरी, दिनांक २८ जून २०२१ ला जिल्हा परिषद शाळा शंकरपूर, दिनांक २९ जून २०२१ ग्रामपंचायत ठाणेगाव, ला दिनांक २९ जून २०२१ ला महिला बचतगट ग्रामसंघ पुराडा क्षेत्र, दिनांक ३० जून २०२१ ला शिवाजी विद्यालय तुळशी, दिनांक १ जुलै २०२१ ला दिव्यांग कलामंच देवूळगाव, दिनांक २ जुलै २०२१ ला ग्रामपंचायत येंगलखेडा, ३ जुलै २०२१ ला शिवानी विद्यालय वडधा, दिनांक ३ जुलै २०२१ महिला बचतगट प्रभाग संघ चिखली, दिनांक ५ जुलै २०२१ ला कोरची तालुक्यात घेण्यात आला, या अभियानात प्रशिक्षक म्हणून आणि सेंद्रिय शेतीधारक रामदास मैंद, छाया खरकाटे, तन्मय भोयर, प्रतिमा नंदेस्वर,भुजंग मडावी,वैशाली शेंडे यांनी स्वतः सेंद्रिय शेती करून आपल्या अनुभवातून दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणीय शेती आणि रासायनिक शेती यातील फरक, हवामान बदलाचे पिकावर होणारे परिणाम, उत्पादनातील अनिश्चितता, वाढणारी महागाई, येणारा दुष्काळ, आर्थिक टंचाई बिमारीचे वाढणारे सावट, आरोग्यावर होणारे परिणाम, यावर मात करण्यासाठी आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसा घेता येईल यासाठी पूर्व परंपरागत शेती पद्धत, बीज निवड प्रक्रिया, पूर्वपरंपरागत बियाणाचे संगोपन आणि संवर्धन करणे, पारंपारिक खत निर्मिती, बाजार व्यवस्थेमुळे उत्पादनावर होणारे परिणाम, नवनिर्मित उपकरणाच्या वापरामुळे होणारा गुराढोरांचा ऱ्हास, शासकीय योजना, दिव्यांग व्यक्तीसाठी बनविलेल्या कंपनीची पुढील वाटचाल आणि कामाची दिशा ,इत्यादी विषयावर क्षेत्रानुसार प्रशिक्षण देऊन लोकांना जागृत करण्यात आले, या उपक्रमाचे व्यवस्थापक मुकेश शेंडे, कार्य समन्वयक मनोज मेश्राम, अंधारलेल्या जीवासाठी उजेडाचे बेड साकारणारे आणि दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी सदोदित कार्य करणारे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, या संस्थेचे विश्वस्थ, संस्थापक संयोजक, डॉ सतीश गोगुलवार, यांनी मोलाचे सहकार्य केले, हा अभियान यशस्वीतेसाठी विकलांग व्यक्तीचे अधिकार विषय समन्वयक संगिता तुमडे, क्षेत्र समन्वयक म्हणून लक्ष्मण लंजे, महेश निकुरे, निशा जांभूळकर यांनी मेहनत घेतली.