आंतरराष्ट्रीय जागतिक ऑलम्पिक दिवस साजरा- अनिल पाटील म्हशाखेत्री यांचे हस्ते रॅलीचे उद्धाटन

आंतरराष्ट्रीय जागतिक ऑलम्पिक दिवस साजरा- अनिल पाटील म्हशाखेत्री यांचे हस्ते रॅलीचे उद्धाटन

गडचिरोली, दि.24: दि. 23 जून 1894 साली आंतरराष्ट्रीय ऑलंम्पिक समितीची स्थापना झाली या दिवसाच्या स्मरणात आंतरराष्ट्रीय ऑलंम्पिक दिवस साजरा केला जातो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली तर्फे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलंम्पिक दिवस दि. 23/06/2022 गुरुवार रोजी सायंकाळी 05.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांस्कृतीक भवन, गडचिराली येथे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पाटील म्हशाखेत्री, श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली चे अध्यक्ष हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून गोंडवाणा विद्यापिठातील गोल्ड मेडलीस्ट अंब्रीश उराडे सर हे होते. याप्रसंगी प्रशांत दोंदल, जिल्हा क्रीडा अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात करियर तयार करणेकरीता त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचा उत्साह वाढविणे इत्यादीकरीता मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी सर्वप्रथम जिल्हा क्रीडा संकुल येथील सराव करीत असणाऱ्या खेळाडूंची क्रीडा संकुल मधून रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्धाटन श्री. अनिल पाटील म्हशाखेत्री यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. त्यानंतर क्रीडा संकुलाच्या मैदानात प्रमुख पाहुण्याच्या हस्ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रीडांगणावर नियमित सराव करणाऱ्या सिकई मार्शल आर्ट या खेळातील कु. एंजल देवकुले व कु. स्नेहल गद्देवार, तर खो-खो मधील सुरज बांबोडे व कु. मोनिका सडमेक व कुस्ती या खेळातील प्रणव पिंपळे या पाच गुणवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते अंब्रीश उराडे सर यांनी आपल्या प्रोत्साहनात्मक भाषणातुन अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी खेळाडूंच्या उदाहरण देऊन खेळाडूंना अधिक परिश्रम करुन क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याकरीता प्रोत्साहित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अनिल पाटील म्हशाखेत्री व जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी खो – खो व कुस्तीच्या खेळाडूंशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना प्रोत्साहन केले. या कार्यक्रमाप्रसंगी सिकई मार्शल आर्टचे प्रशिक्षक संदिप पेदापल्ली, खो-खो चे प्रशिक्षक प्रविण बारसागडे, व्हॉलीबॉलचे प्रशिक्षक चैतन्य भसारकर, ॲथलेटीक्स या खेळाचे प्रशिक्षक कु. मृणाली शराफ या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे यशस्वितेकरीता क्रीडा अधिकारी घनश्याम वरारकर, विशाल लोणारे, सुनिल चंद्रे, कुणाल मानकर, महेंद्र रामटेके, चंद्रकांत आत्राम इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम प्रमुख, एस.बी.बडकेवार यांनी केले.