मनपा शाळा इयत्ता10 वीचा निकाल १००% ३६ पैकी २६ विद्यार्थी डिव्हीजनमध्ये

मनपा शाळा इयत्ता10 वीचा निकाल १००% ३६ पैकी २६ विद्यार्थी डिव्हीजनमध्ये

चंद्रपूर १७ जुन – चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळेचा इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला असुन शाळेचे २६ विद्यार्थी डिव्हिजनमध्ये आले आहेत.

मनपाद्वारा संचालित या शाळेच्या विद्यार्थ्यांची यंदाची ही पहिलीच बोर्ड परीक्षा होती. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांच्या नियोजनबद्ध शिक्षण पद्धतीने शंभर टक्के यश मिळाले आहे. आयुक्त राजेश मोहिते यांच्या मार्गदर्शनात, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल व उपायुक्त अशोक गराटे यांच्या नेतृत्वात मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत व शिक्षक वृंद अथक मेहनत घेत असुन खाजगी शाळेच्या बरोबरीने मनपा शाळांना उभे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे.

शाळेतील यश बोडे ८६.२० टक्के,सौम्यक खोब्रागडे ८५. ८० टक्के,सलोनी कांबळे ८५. ६० टक्के, ममता बाली ८५ टक्के गुण मिळविले आहेत. शाळेतील सर्व विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असुन त्यांनी मिळविलेले यश असामान्य म्हणायला हवे. महानगरपालिकेच्या शाळेत सर्वसाधारण गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. डिजीटल पद्धतीने शिक्षण सुरु केल्यामुळे कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे विद्यार्थीही आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत.