पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली,(जिमाका)दि.17:जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली या कार्यालयाचे वतीने दिनांक 20 व 21 जून 2022 रोजी कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.

करिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर स्वत:ची नोंदणी (Employment Card) करुन किंवा ज्यांनी यापूर्वी नाव नोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड लॉगीन करुन दिनांक 20 व 21 जून 2022 रोजी कालावधीत वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदाकरीता उद्योजकांनी नमुद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे. उद्योजकांशी संपर्क साधुन ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळावा लाभ घ्यावा, असे सहाय्यक आयुक्त ,जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.