17 जूनला महाज्योतीतर्फे गडचिरोली येथील संस्कृती लॉनमध्ये नि:शुल्क प्रवेशासह ‘तृतीय रत्न’ */ रंगमंचावरील पहिले समाजिक क्रांतीकारी नाटक */ एकुण 36 प्रयोगाची यशस्वी वाटचाल

0

17 जूनला महाज्योतीतर्फे गडचिरोली येथील संस्कृती लॉनमध्ये नि:शुल्क प्रवेशासह ‘तृतीय रत्न’

*/ रंगमंचावरील पहिले समाजिक क्रांतीकारी नाटक

*/ एकुण 36 प्रयोगाची यशस्वी वाटचाल

गडचिरोली येथील संस्कृती लॉनमध्ये दिनांक 17 जून रोजी सायंकाळी 7 वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणीक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा महाज्योतीचे अध्यक्ष श्री. विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, श्री. लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे.

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. प्रकाश योजना शिवप्रसाद गौड यांची आहे. प्रा.डॉ.शेखर डोंगरे, संजीव रामटेके, अरविंद खंदारे, नागसेन गायकवाड, चंद्रकांत तोरणे, दिपाली बडेकर, कल्याणी खोब्रागडे या प्रमुख कलाकारांसह एकुण 30 सहकलाकारांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात 36 प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रबोधनात्मक प्रतिसाद मिळाला आहे. करिता सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांनी केले आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here