17 ते 24 जूनपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळावा

17 ते 24 जूनपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळावा

भंडारा, दि. 16 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतंर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ऑनलाईन पध्दतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 17 ते 24 जून पर्यंत करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्तांनी रिक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Online job fair Bhandara -2 येथे घेवून आपल्या आवश्यकतेनुसार बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध आसलेली यादी ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करावी.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयाचे ऑनलाईन नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच नोकरीसाठी इच्छुक उमेदवांरानी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा Online job fair Bhandara -2 येथे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीन करण्यात येत आहे.

अधिक माहीतीसाठी जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र, भंडारा यांचेशी 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. (Email.Id-bhandararojgar@gmail.com) असे जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी कळवले आहे.