भंडारा : गुरुवारी जिल्ह्यात आठ कोरोना बाधित तर एक डिस्चार्ज

गुरुवारी जिल्ह्यात आठ कोरोना बाधित तर एक डिस्चार्ज

एकूण डिस्चार्ज 66776

एकूण पॉझिटिव्ह 67941

क्रियाशील रुग्ण 23

आज मृत्यू शून्य

एकूण मृत्यू 1142

 रिकव्हरी रेट 98.29 टक्के

मृत्यू दर 01.68

आजच्या टेस्ट 700

एकूण टेस्ट 606296

भंडारा, दि. 16 : जिल्ह्यात गुरुवारी आठ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज (दि.16) बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक आहे. गुरुवारी 700 व्यक्तींची चाचणी केली असता आठ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 23 सक्रिय रुग्ण आहे. सक्रिय असलेल्या 23 बाधित रुग्णांपैकी 23 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 66 हजार 776 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 67 हजार 941 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.29 टक्के आहे. आतापर्यंत 6 लाख 6 हजार 296 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 67 हजार 941 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 04, मोहाडी 00, तुमसर 01, पवनी 03, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदूर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1142 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.