नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात केवळ ऑफलाईन बुकींग करूनच पर्यटकांना प्रवेश

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात केवळ ऑफलाईन

बुकींग करूनच पर्यटकांना प्रवेश

भंडारा, दि. 15 : नवेगाव- नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात रस्ते पर्यटनाकरिता सुव्यवस्थित राहिल्यास 16 जून ते 30 या कालावधीत केवळ ऑफलाईन बुकिंग व स्पॉट बुकींगनेच पर्यटकांना प्रवेश करता येईल, असे उपवनसंरक्षक, गोंदिया यांनी कळवले आहे.

अति पावसामुळे रस्ते नादुरुस्त झाल्यास वाहन चालविणे शक्य नसल्यास वाहनांना प्रवेश बंद आहे. त्या काळात ऑनलाईन पद्धतीने सफारी पूर्णपणे बंद राहील व पाऊस आल्यास व रस्ते पर्यटकांना करता अयोग्य ठरल्यास लघु सूचनेद्वारे पर्यटन केव्हाही बंद करण्यात येईल. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अंतर्गत व्यवस्थापनाकरिता नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे पर्यटन ऑनलाईन व ऑफलाईन बुकिंग पद्धतीने पूर्णपणे बंद राहील, याची पर्यटकांनी नोंद घ्यावी, असे उपवनसंरक्षक जयरामगौडा आर. यांनी कळवले आहे.