खत उपलब्धतेची मागणी आता एका क्लीकवर खरीप हंगामासाठी कृषी विभागाचा उपक्रम

खत उपलब्धतेची मागणी आता एका क्लीकवर

खरीप हंगामासाठी कृषी विभागाचा उपक्रम

भंडारा, दि. 14 : खरीप हंगामात शेतकऱ्यांना जिल्ह्यातील खतांची उपलब्धता लगेच कळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ब्लॉगची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय कृषी केंद्रावर उपलब्ध असलेल्या खत साठ्याची माहिती adobhandarafertilizerblogspot.com या लिंकवर उपलब्ध आहे. या ब्लॉगवर गेल्यास शेतकऱ्यांना उपलब्ध खतसाठ्याची माहिती सहज मिळेल.

 

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकरी शेतीच्या मशागतीत गुंतलेला असून काही कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना खत नसल्याचे सांगत खताची साठेबाजी करत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतात व त्यांना जास्त भावाने बाजारातून खत खरेदी करावे लागते. यासाठीच शेतकऱ्यांना सुलभता व्हावी या उद्देशाने कृषी विभागाने हा ब्लॉग तयार केला आहे. साठेबाजीला आळा घालण्यासाठी या ब्लॉगचा उपयोग होणार आहे.यासोबतच शेतकऱ्यांसाठी बियाणे, खत, किटकनाशक तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शेतकऱ्यांव्दारे 9823547861 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन देखील कृषी विकास अधिकारी व्ही. जे. पाडवी जिल्हा परिषद, भंडारा यांनी केले आहे.