स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मा.पंतप्रधान भारत सरकार यांच्या परिसंवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभार्थीचा सहभाग

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत मा.पंतप्रधान भारत सरकार यांच्या परिसंवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे लाभार्थीचा सहभाग

 गडचिरोली,दि.03:भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष होत असल्याचे औचित्य साधुन केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. या धर्तीवर दिनांक 31 मे 2022 रोजी मा.पंतप्रधान हे शिमला,हिमाचल प्रदेश येथुन आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे राज्य व जिल्हा स्तरावर विविध योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.या कार्यक्रमाला जिल्हयाअंतर्गत गावपातळीवरील 20 गरोदर व स्तनदा माता ज्यांना योजनेचा लाभ प्राप्त झालेला आहे. अशांना जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे उपिस्थत राहले.खासदार,अशोकजी नेते,आमदार,क्रिष्णाजी गजबे,जिल्हाधिकारी,संजय मिना,मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशिर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी,डॉ.दावल साळवे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.समिर बनसोडे, तसेच नोडल अधिकारी डॉ.सुनिल मडावी, या कार्यक्रमात  यांचे हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

            केंद्र शासनद्वारे 01 जानेवारी 2017 पासुन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झालेली आहे.या योजनेचा लाभ तीन टप्प्यात लाभार्थ्यांना त्यांच्या आधार सिडेंडबँक खात्यात रुपये 5000/- जमा केले जातात. या योजनेसाठी लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, लाभार्थ्यांचे आधार कार्डशी जोडलेले बँक खाते,गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंदणी,बाळाची जन्मनोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरणाच्या प्रतची आवश्यकता असते. शासकीय अथवा निमशासकीय सेवेतील तसेच खाजगी नोकरीतील ज्या मातांना पगारी प्रसुती रजा मंजुर आहे अशा मातांना ही योजना लागु होत नाही.

            दिनांक 31 मे 2022 रोजी मा.पंतप्रधान,भारत सरकार व मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे द्वारे साधण्यात आलेल्या संवादामुळे लाभार्थ्यांमध्ये व जनमाणसात योजनेची जागृती निर्माण झालेली असुन भविष्यात 20 लाभार्थ्यांमुळे आणखी लाभार्थी जुळल्या जातील या बद्दल खात्री असल्याचे जिल्हयाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक कु.अश्विनी मेंढे यांनी सुचविले. तसेच सर्वाचे आभार जिल्हा कायक्रम सहाय्यक चंदु वाघाडे यांनी मानले.

जिल्हाधिकारी, संजय मिना

जिल्हयातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी दिनांक 31 मे 2022 रोजी मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी थेट शिमला,हिमाचल प्रदेश येथुन संवाद साधला.जिल्हयातील प्रधानमंत्री मातृ वंदनेचे काम चांगले असुन 35005 लाभार्थ्यांचे खात्यात 14 कोटी 94 लाख इतकी रक्कम वळती झालेले आहे.प्रत्येक पहिल्या खेपेच्या मातेला या योजनेचा लाभ मिळेल याकरीता जिल्हा अग्रेषीत राहील याबाबत आदेश आरोग्य विभागास देण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशिर्वाद

जिल्हयातुन ठराविक उत्स्फुर्त 20 गरोदर व स्तनदा माता हया संवादासाठी उपस्थित राहल्याने यावरुन आरोग्य विभागाची यंत्रणा अतिशय चोखपणे कार्य करीत असल्याचे दिसुन येते. व यापुढेही आरोग्य विभागाकडुन प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे काम वेळेत पुर्ण होऊन प्रत्येक लाभार्थ्यास लाभ मिळेल याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सांगण्यात आले