पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 

गडचिरोली, दि.03:जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 जून 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

    सदर रोजगार मेळाव्यामध्ये धुत ट्रान्समिशन,औरंगाबाद ही उपस्थित असणार असून सदर रोजगार मेळाव्याकरीता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा,शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दिनांक 25 मे 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांनी केले आहे.