विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन

विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी

विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन

चंद्रपूर,दि. 21 जून : विदेशात जाणाऱ्या नागरिकांकरिता बुधवार दि. 23 जून 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डी. ई. आय. सी इमारत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबिरामध्ये एकही डोज न झालेल्या नागरिकांना पहिला डोज व पहिला डोज घेऊन 28 दिवस झालेल्या लाभार्थ्यांना दुसरा डोज देण्यात येणार आहे. या लसीकरण शिबिराचा लाभ दिनांक 31 ऑगस्ट 2021 पर्यंतच विदेशात जाणाऱ्या नागरिकांकरिता उपलब्ध आहे.

हे असतील कोविड-19 लसीकरण शिबिरास पात्र लाभार्थी :

शिक्षणाकरीता विदेशात जाणारे विद्यार्थी, नोकरीकरीता विदेशात जाणारे नागरीक, टोकियो येथे होणाऱ्या ऑलंपिक गेमकरीता जाणारे खेळाडू व इतर आवश्यक निवड करण्यात आलेले कर्मचारी पात्र असतील.

या दस्ताऐवजाच्या आधारे लाभार्थ्यांना करण्यात येईल लसीकरण :

विदेशात ज्या संस्थेत दाखला झालेला आहे, त्याचे दस्ताऐवज अथवा ज्या संस्थेसोबत नोंदणी होणार आहे त्या संस्थेसोबत झालेल्या व्यवहाराचा तपशिल आवश्यक आहे.तसेच जे विद्यार्थी यापुर्वीच विदेशात शिक्षण घेत आहे, ते विद्यार्थी संस्थेने रुजू होण्याकरीता केलेल्या व्यवहाराची प्रत सोबत आणावी. नोकरीकरीता विदेशात जाणाऱ्यांसाठी इंटरव्यु कॉल लेटर किंवा नोकरी भेटल्याचा पुरावा सादर करावा लागेल. टोकियो ऑलंपिक खेळाकरीता जाणाऱ्यांसाठी खेळाकरीता नामनिर्देशित झाल्याचे दस्ताऐवज सादर करावे लागतील. तर लसीकरणा दरम्यान पासपोर्ट सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.