सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
दारूबंदी तसेच शेतकऱ्याचं परिपत्रक हटविण्याच्या विरोधात सा. यु. ब्रि. संघटनेने आज दिनांक 16/06/2021ला दिले जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन.
सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष अमोल सेवादास निनावे यांनी दारूबंदी हटविण्याचे विरोधात तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रु प्रोत्सहन म्हणून मिळणारे पैसे शेतकरी लोकांना न दिल्यामुळे व शेतकऱ्यांचे सातबारे घेऊन धान्य नं घेण्याचा परिपत्रक काढल्यामुळे,24 तास शेतकरी वर्ग यांना वीज देण्यात यावी यासाठी दि 16/06/2021 रोज बुधवारला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सरकारचा निषेध वेक्त केले .
तसेच हे चारही विषय लवकरात लवकर मार्गी न लागल्यास येणाऱ्या आठ दिवसात आणखी साखळी उपोषण तसेच मुंडन आंदोलन करण्याचा इशारा दिले.
शेतकरी लोकांनी नियमित कर्ज फेडलेले आहेत त्यांचे कर्ज माफ करून आपण ५०,००० रु प्रोत्सहन म्हणून देणार होते. पण अजूनही ते शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आज शेतीचे हंगाम सुरु झालेले आहे त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष्य देण्याची आवश्यकता आहे असे सामाजिक युवा ब्रिगेड ची मागणी आहे.
या सर्व गोष्टी चा विचार करता सामाजिक युवा ब्रिगेड च्या सर्व पदाधिकारी तसेच सदश्यनी मिळून आज जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना अनेक लोकांच्या समस्यां बाबत निवेदन दिले.
तसेच माजी राज्यमंत्री तथा आमदार श्री सुधीर मुनगंटीवार, माजी आमदार तथा विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष्य श्री वामनराव चटप यांची भेट घेऊन प्रत्यक्षात अनेक समश्या बद्दल चर्चा केली.
निवेदन व चर्चा करताना सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष अमोल सेवादास निनावे, सदस्य संजय नैताम, महेश गिरडकर,अतुल पेंदाम, कलाम शेख, मुमताज शेख, नकील शेख, पवन खोब्रागडे,सुरज खोब्रागडे तसेच अन्य सदश्य उपस्थित होते.