chandrapur I चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा विरोधात तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा विरोधात तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन.

मुंडन करण्याचा युवा ब्रिगेड संघटनेचा इशारा.

चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविल्याची घोषणा मागील आठवड्यात केली. त्यामुळे आज पर्यंत बंद असलेली चंद्रपूर जिल्ह्याची दारू अचानक सुरु होत आहे. त्यामुळे सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेचे पदाधिकारी यांनी जाहीर निषेध व्यक्त करत सिंदेवाही चे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडे दारूबंदी कायम ठेवण्यात यावी यासाठी आज लेखी निवेदन दिले आहे. दारूबंदी साठी राज्य सरकार कोणत्याही प्रकारचे पर्यंत न करता सरळ दारू बंदी हटविण्याचा निर्णय घेणे हे चुकीचे आहे असा आरोप केला आहे.
सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेने दोन वर्षांपासून दारू विक्रेत्या विरोधात सतत प्रयत्न करत आहे.
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी कायम ठेवून नवीन कठोर कायदे बनवून नविन अधिकारी नेमावे. व उठवलेली दारूबंदी कायम ठेवावी अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेने केली आहे.
दारू बंदी हटवल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर मुंडन आंदोलन करणार असा इशारा दिला आहे.
निवेदन देताना उपस्थित सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष अमोल निनावे, सदस्य प्रणय गायकवाड, गजानन गुरुनुले, अर्चना कुंभरे उपस्थित होते.