जिल्हाधिकाऱ्यांची कारागृहाला भेट व पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांची कारागृहाला भेट व पाहणी

 

भंडारा, दि. 27 मे, : जिल्हा कारागृहात बंदीवानांना मिळणाऱ्या जेवनाची, निवासाची, बंदीवानांना त्यांच्या कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी असणाऱ्या सुविधेची तसेच महिलांसाठी असणाऱ्या विभक्त सेलला आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

कारागृहातील बंदीवांनाची नियमित आरोग्य तपासणी करावी. कारागृहात राष्ट्रीय सण साजरे करावे. कारागृहातील कामकाजात संगणकाचा वापर करण्यात यावा. बंदीवानांसाठी उपलब्ध असलेल्या व्हिडीओ कॉलींग सुविधेवर बारकाईने लक्ष ठेवावे त्याचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कारागृह प्रशासनास यावेळी दिल्या. जिल्हा कारागृहाचे अधिक्षक देवराव आडे यांनी बंदीवानांना उपलब्ध असणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी दिली.

उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोनकुवर, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) मनीषा कुरसंगे, कारागृह अधिक्षक देवराव आडे, नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव, जिल्हा कारागृहाचे अधिकारी श्री. आगाशे यावेळी उपस्थित होते.