जिल्हयातील 50 दुग्धउत्पादक शेतकरी प्रशिक्षणार्थी आनंद (गुजरात) येथे रवाना

जिल्हयातील 50 दुग्धउत्पादक शेतकरी प्रशिक्षणार्थी आनंद (गुजरात) येथे रवाना

गडचिरोली, दि.26:- जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे मार्फत आत्मा यांचे कडून प्राप्त झालेल्या निधीतून राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ, आंनद (गुजरात) येथे गडचिरोली जिल्हयातील 50 दुग्धउत्पादक शेतकरी प्रशिक्षणार्थी आनंद (गुजरात) येथे रवाना झाले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी, धनाजी पाटील यांचे हस्ते बसला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ झाले. त्यांनी सहभागींना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी जिल्हा नेहरु युवा केंद्राचे अमित पुंडे, आपत्ती व्यवस्थापक कृष्णा रेड्डी, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सचिन यादव उपस्थित होते. तसेच प्रशिक्षणासाठी जाणारे नेहरु युवा केंद्राचे जिल्ह्य़ातील युवा प्रतिनिधी पुरुष व महिला, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या बचत गटांच्या 50 महिला व पुरुष प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. दिनांक 29 ते 31 मे पर्यंत दुग्धव्यवसाय तथा पशुसंवर्धन बाबतचे प्रशिक्षण कार्यक्रम गुजरात येथे राबविण्यात येणार आहेत.