जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालय येथे पार पडले आरोग्य तपासणी शिबीर

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालय येथे पार पडले आरोग्य तपासणी शिबीर

 

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे यावर्षी सुध्दा राज्यभरात जागतिक तंबाखू दिनाच्या औचित्याने जिल्हा स्तरावर “We Need Food, no tobacco” या शिर्षकाखाली सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे नियोजीत असल्याने आज दिनांक २६/०५/२०२३ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या वतीने पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडु आलाम हॉल मध्ये जागतिक तंबाखू दिन व हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत विविध आजारासंबंधी तपासणी शिबीर पार पडले.

 

सदर शिबीरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथिल तज्ञ डॉक्टर उपस्थित होते. शिबीरामध्ये उपस्थित सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार तसेच नवनियुक्त पोलीस अंमलदार यांना तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. यासोबतच कार्यक्रमात उपस्थित मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, सर्व अधिकारी व अंमलदार यांनी तंबाखू सारख्या विषारी पदार्थापासुन दुर राहुन आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन निरोगी आयुष्य जगा असा सल्ला दिला. तसेच तंबाखू सारख्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी उपस्थितांना “तंबाखू मुक्त प्रतिज्ञा” दिली. तसेच सदर शिबीरात उपस्थित अधिकारी / अंमलदार यांची मौखीक आरोग्य तपासणी, दातांची तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर इ. तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडुन करण्यात आल्या.

 

सदर आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रमामध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा., प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्री. अजय अहीरकर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील मेडीकल ऑफीसर (आयुष) डॉ. वर्षा कापगते मॅडम, जिल्हा सल्लागार डॉ. स्वाती साठे मॅडम, पब्लीक हेल्थ मॅनेजर डॉ. मृणाली रामटेके मॅडम, समन्वय अधिकारी डॉ. प्रेरणा राऊत मॅडम, सायकोलॉजीस्ट डॉ. श्री. अजय खैरकर, डेन्टल हायजेनिस्ट डॉ. रिना मेश्राम मॅडम, समाजसेविका श्रीमती. मिना दिवटे मॅडम, फिजीशियन डॉ. श्री. निलेश गावडे, मेडीकल ऑफीसर (आयुष) डॉ. करुणा ठाकूर, मेडीकल ऑफीसर (आयुष) डॉ. शिल्पा कोहळे व योगगुरु (आयुष) श्री. नीजर पेशत्तीवार हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि नरेंद्र पिवाल व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.