जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीकरिता अशासकीय सदस्यांकडून अर्ज आमंत्रीत

जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीकरिता अशासकीय सदस्यांकडून अर्ज आमंत्रीत

 

भंडारा, दि. 26 मे : जिल्ह्यातील जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक समिती भंडारा करिता अशासकीय सदस्य नियुक्ती करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयामार्फत गोशाळा कार्यकारणी सभासद, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था सदस्य, प्राणी कल्याणासाठी काम करणारे सदस्य यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

 

इच्छूकांनी आपले परिचय पत्र व इच्छा पत्र /अर्ज फोटो, आधार कार्ड, चारित्र प्रमाण पत्र पोलीस विभागाकडून प्राप्त करून सादर करावे. तसेच आवश्यकते नुसार अनुषंगिक कागदपत्रे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय बडा बाजार भंडारा येथे सादर करावे.