स्त्रीशक्ती समाधान शिबीराच्या माध्यमातून सखी वन स्टॉप सेंटर योजनेची जनजागृती

0

स्त्रीशक्ती समाधान शिबीराच्या माध्यमातून सखी वन स्टॉप सेंटर योजनेची जनजागृती

 

गडचिरोली, दि.26 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतात. त्यानुषंगाने मंत्री, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये सदर महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर शासनातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर या कार्यक्रमाचे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तहसील कार्यालय सभागृत येथे दिनांक 25 मे रोजी घेण्याचे आयोजन करण्यात आले. या शिबीराअंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर योजनेची माहितीपर स्टॉल लावून जनजागृती करण्यात आली.

 

महिला व बाल विकास विभागाअंतर्गत येणारी केंद्र शासन पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर ही योजना पिडीत महिलांना आधार व एकाच छताखाली अनेक सेवा / सुविधा याप्रमाणे वैद्यकीय, समुपदेशन, कायदेशीर, पोलीस व निवास अशा सेवा / सुविधा देणारी एक महत्पपूर्ण व यशस्वी योजना आहे. सदर योजनेचे अनेक फायदे असले तरीही तुलनेने जनजागृती कमी आहे.आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक, कौंटुबिक किंवा इतर कोणत्याही हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार मिळावा व सदर योजनेचा लाभ मिळावा याकरीता जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचविने गरजेचे आहे.

 

त्याकरीता सदर शिबीराच्या माध्यमातुन सखी वन स्टॉप सेंटर योजनेची माहितीपर जनजागृती स्टॉल लावुन विविध महिला व‍ नागरीकांना योजनेची माहिती देण्यात आली. आपल्या जवळपास पीडीत महिला व बालके आढळल्यास 181, 112, 1098, 1091, 155209 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा तथा जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटर ला संपर्क (07132-295675) करण्याचे आवहन करण्यात आले. त्याप्रमाणे सामान्य नागरीक तथा महिलांनी मोठ्या संख्येने स्टॉल ला भेट देवून या योजनेची माहिती जाणून घेतली व अशी पीडीत महिला व बालके आढळल्यास सखी वन स्टॉप सेंटर ला अवगत करुन सहाय्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.

 

सखी वन स्टॉप सेंटर योजनेच्या दिनांक 25/05/2023या एक दिवसीय माहितीपर जनजागृती स्टॉल च्या यशस्वीतेकरीता मा. श्री. प्रकाश भांदककर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात तसेच मा. रुपाली काळे, सरंक्षण अधिकारी, गडचिरोली, सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली च्या केंद्रप्रशासक, संगीता वरगंटीवारयांचे सहकार्याने व कर्मचारी अतुल कुनघाडकर, लोमेश गेडाम यांच्या मदतीने पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here