राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ आनंद (गुजरात) येथे “आत्मा” गडचिरोली अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी प्रशिक्षणाकरीता जाणार

0

राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ आनंद (गुजरात) येथे “आत्मा” गडचिरोली अंतर्गत

जिल्ह्यातील शेतकरी प्रशिक्षणाकरीता जाणार

गडचिरोली, दि.25: प्रकल्प संचालक (आत्मा) गडचिरोली अंतर्गत जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेल्या निधीमधून राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळ, आंनद (गुजरात) येथे गडचिरोली जिल्हयातील 50 दुग्धउत्पादक शेतकरी प्रशिक्षणार्थी यांना दिनांक 29 मे ते 31 मे 2023 पर्यंत दुग्धव्यवसाय तथा पशुसंवर्धन बाबतचे प्रशिक्षण कार्यक्रम (3 दिवसीय) वरील कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.

प्रशिक्षणाकरीता गडचिरोली जिल्हयातील 50 दुग्धव्यवसाय लाभार्थ्यांना दिनांक 26 मे 2023 रोजी सकाळी 12.30 वाजता जिल्हाधिकारी, तथा अध्यक्ष कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली हे खाजगी वाहनाला हिरवी झेंडी दाखवून शुभेच्छा देणार आहे. असे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली सचिन यादव यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here