आय.आय.एच.टी.बरगढ/वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सूचना

0

आय.आय.एच.टी.बरगढ/वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सूचना

गडचिरोली, दि.25:केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2023-24 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यास क्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता 13 जागा व आर्थिक दृष्टया दुर्बल घटकाकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर/ सोलापूर/मुंबई/ औरंगाबाद यांचे मार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज दिनांक 20 जून 2023 पर्यत मागविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दिनांक 20 जून 2023 पर्यंत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर एम.जे.प्रदिप चंदन भा.प्र.से.यांनी कळविले आहे.

विदर्भातील 11 जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, प्रशासकीय इमारत क्रं.2, 8 वा माळा, बि विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001, दुरध्वनी क्रमांक 0712- 2537927 यांचेकडून प्राप्त करुन घ्यावी. तसेच अर्जाचा नमुना व विहित पात्रता कार्यालयाचे नोटीश बोर्डावर लावण्यात आलेली आहे. असे प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर सीमा पांडे यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here