पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्न

0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्री शक्ती समाधान शिबीर संपन्न

गडचिरोली, दि.25: समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी समस्या यांची शासकीय यंत्रणेकडुन सोडवणुक’ करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी,यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन दिनांक 24/05/2023 रोज बुधवार ला सकाळी 9 वाजता नगर पंचायत भवन चामोर्शी येथे करण्यात आले होते.

सदर शिबीरात शासनाच्या विविध विभागाव्दारे यामध्ये तहसिल कार्यालय,पंचायत समीती,महिला व बाल विकास विभाग,नगर पंचायत,आरोग्य विभाग,उमेद,वॅन स्टॉप सेंटर,वन विभाग,मनेरेगा,माविम,इत्यादीनी स्टॉल लावून विभाग प्रमुखानी योजनेसंदर्भात माहीती दिली. सदर शिबीरात मोठया प्रमाणात महिलांचा सहभाग दिसून आला. सदर समाधान शिबीरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्याकरिता पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन तहसिलदार संजय नागटिळक यांनी केले.अध्यक्ष म्हणून तहसिलदार,संजय नागटिळक चामोर्शी, प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी, सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, प्रफुल हुलके, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.इनवते प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी, गजानन भांडेकर, नगर पंचायत सभापती, गिताताई सोरते, नगरसेविका, काजल नैताम, प्रेमा आईंचवार, गेडाम, तसेच इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबीर यशस्वी करण्याकरिता बाल विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन किरण कांबळे व आभार जयंत जथाडे यांनी मांनले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here