आरसेटीचे दहा दिवसीय भाजीपाला लागवड प्रशिक्षण

0

आरसेटीचे दहा दिवसीय भाजीपाला लागवड प्रशिक्षण

 

भंडारा, दि. 25 मे : भारत सरकार, महाराष्ट्र शासन व बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांचेमार्फत निशुल्क भाजीपाला लागवडचे दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम 29 मे 2023 पासून सुरु होत आहे.

 

प्रशिक्षणामध्ये भाजीपाला लागवडीचे महत्व व व्यापकता, भाजीपाला व्यावसायिक लागवड, पिकांची निवड आणि जमीनीची ओळख, भाजीपाला बियाणे, सेंद्रीय शेती व गांडुळ खत पध्दती, कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायाची संधी, बाजार सर्वेक्षण, बँकेच्या योजना याबद्दल मार्गदर्शन दिले जाईल. प्रशिक्षण प्रवेशाकरीता आयोजित मुलाखतीसाठी येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड, सोबत आणणे आवश्यक आहे.

 

प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवन, चहा, नाश्ता, राहणे आदींची सोय मोफत केली जाईल. स्वयरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय 18 ते 45 वर्ष, शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा बेरोजगार पुरुष, महिलांनी मुलाखतीकरीता 29 मे ला सकाळी दहा वाजता बि. ओ. आई. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, लालबहादुर शास्त्री (मनरो) शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निर्देशक मिलींद इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9511875908 किंवा 8669028433 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here