गोळीबाराच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद चंद्रपूर जिल्हा पोलीसांची यशस्वी कामगिरी

0

पोलीस स्टेशन मुल येथील गोळीबाराच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद चंद्रपूर जिल्हा पोलीसांची यशस्वी कामगिरी

 

चंद्रपुर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष श्री संतोषसींग चंदेलसींग रावत वय 60 वर्ष रा. मुल यांचेवर दि. 11/05/2023 रोजी रात्रो 09:15 वा. ते 09:30 वाजे दरम्यान चंद्रपुर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, शाखा मुल समोर रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या मारोती सुझुकी स्विफ्ट कार मधुन आलेल्या अज्ञात बुरखाधारी हल्लेखोरांनी त्यांना जिवे ठार मारण्याच्या उददेशाने त्यांचेवर बंदुकीने गोळया झाडल्या त्यामध्ये ते जखमी झाले, त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्या संदर्भात पोलीस ठाणे मुल येथे श्री संतोषसींग चंदेलसींग रावत यांच्या तक्रारीवरून अप क 178 / 23 कलम 307, 34 भा.द.वि. सह कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची एकुण 16 पथके तयार करून पाहीजे असलेल्या आरोपींची शोध मोहीम राबवीली. तपासादरम्यान आरोपींनी स्वतःची ओळख लपविण्यासाठी बुरखा परीधान केला होता तसेच गुन्हयात वापरलेल्या गाडीची ओळख लपविण्यासाठी बनावट वाहन क्रमांक वापरल्याचे दिसुन आले. आरोपी व वाहनाच्या शोध मोहीमे दरम्यान विविध तपास पथकांमार्फत कौशल्यपुर्ण तपास करण्यात आला. या पथकांकडुन केलेल्या कौशल्यपूर्ण तपासादरम्यान ईसम नामे 1) राजवीर कुंवरलाल यादव वय 36 वर्ष व 2 ) अमर कुंवरलाल यादव वय 29 वर्ष, दोन्ही रा. चंद्रशेखर आझाद चौक बाबुपेठ चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल विचारणा केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली..

 

यातील फिर्यादी यांनी आरोपींचे मार्फत काही मुलांकडुन वे. को.लि. मध्ये नौकरी लावुन देतो म्हणुन घेतले होते परंतु त्यांना नोकरी लावुन दिली नाही व घेतलेली रक्कम सुध्दा वारंवार मागुनही परत केली पैसे नाही याचे रागातुन आरोपींनी फिर्यादी यांचेवर जिवे मारण्याचे उद्देशाने गोळीबार करून पसार झाले होते असे प्राथमिक तपासावरून दिसुन आले आहे. तरी आरोपींकडे गुन्हयाबाबत सर्वकष दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

 

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली श्री सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदुर हे करीत असुन सदर गुन्हयाचे तपास कामी श्री आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, श्री. मल्लिकार्जुन इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल, पो.नि. श्री. सतिषसिंह राजपुत, पोलीस ठाणे चंद्रपुर शहर, पो. नि. श्री. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर, पो.नि. श्री सुमीत परतेकी पोलीस ठाणे मुल, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस ठाणे मुल, पोंभुर्णा, गोंडपींपरी, सावली, पाथरी, उमरी पोतदार, कोठारी, सिंदेवाही, बल्लारशाह, चंद्रपुर शहर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेवुन सदर आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here