मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संगीता माने

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संगीता माने

 

भंडारा, दि. 23 मे, : महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वैयक्तिक शेततळे निर्मिती ही योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी केले आहे.

 

योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी https:/mahadbt.mahit.gov.in या संकेतस्थळावर जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा, शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगनक, लॅपटॉप, सामुदाईक सेवा केंद्र, ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामुहीक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा ईतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.