सिरोंचा तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे आयोजन

सिरोंचा तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीराचे आयोजन

गडचिरोली,दि.19: समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टिने महिलांच्या तक्रारी/समस्या शासकीय यंत्रणेकडून सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर” आयोजीत करायचे आहे. तसेच महिलांकरीता शासनाच्या विविध विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनाची माहिती महिलांना उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरीता दिनांक 25 मे 2023 ला सकाळी 10.00 वा. तहसिल कार्यालय, सिरोंचा येथे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर” आयोजित केलेले आहे. तरी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी विहीत नमुन्यात लेखी अर्ज/तक्रारीसह (3 प्रती मध्ये) स्वता उपस्थित रहावे. लेखी अर्जाचा नमुना गावातील प्रत्येक अंगणवाडी/ग्रामपंचायत/तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता तहसिल कार्यालय, सिरोंचा/ बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सिरोंचा यांचेशी संपर्क साधावे. असे तहसिलदार तथा अध्यक्ष तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन समिती, सिरोंचा यांनी केले आहे.