2 हजार 726 व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ खाणे पडले महागात

2 हजार 726 व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ खाणे पडले महागात

· तंबाखू सोडा आरोग्य सांभाळा

 

भंडारा, दि. 19 मे : तंबाखूची साथ ही आरोग्यावर आलेले सर्वात मोठे संकट आहे. तंबाखू सेवन हे जगामधील सर्वात मोठे संकट आहे. गुटखा आणि तंबाखू खाल्याने तोंडाचा कर्करोग होतो, हे आपण हानपणापासून ऐकत आहोत. यासर्दर्भत गावात, शहरात, राज्यात, देषात आणि जगभरात जनजागृती केली जाते. सिगारेटच्या पाकिटावर देखील कर्करोगाची भ्यानकता दर्षविणारे चित्रही प्रसिद्ध करण्याचे बंधन आरोग्य विभागाने घातले असुन त्याचेही काटेकोर पालन होते. मात्र, तंबाखू खाण्याऱ्यांचे आणि सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाण कमी होतांना दिसुन येत नाही. या व्यसनामळे नागरिक स्वतःहुन कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देतांना दिसुन येतात. क्षणभराच्या नषेसाठी आणि तलफ भागविण्यासाठी तंबाखू, सिगारेटच्या आहारी जाणाऱ्या मंडळीमुळे कुटुंबाचे किती नुकसान होते, ही बाब आकलनापलीकडचा आहे.

 

जगामध्ये दरवर्षी जवळपास 63 लाख लोकांचा मुत्यु हा तंबाखू सेवनाने होतो. भारतात दररोज 2 हजार 500 व्यक्तीचा मृत्यु तंबाखूमुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार सन 2030 पर्यत 80 लाखापेक्षा जास्त लोकांचा मुत्यु हा तंबाखू सेवनामुळे होण्याचे भाकीत केले आहे. एक बिडी किवा सिगारेट ओढल्यामुळे संबधित व्यक्तीचे आयुष्य हे साडेपाच मिनिटांनी कमी होते. हे सर्वेक्षणातुन वैद्यकिय तंज्ञांनी याबद्दल चिंता व्यक्त करीत त्यावर उपाय म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू केला आहे.

 

या कार्यक्रमामध्ये 1) तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये विद्यार्थ्याना तंबाखूचे दुष्परिणाम कसे होतात यविषयी जनजागृती केली जाते. 2) त्याचप्रमाणे ठिकठिकाणी शिबिरे घेवुन सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करून गाव व परिसर तंबाखूमुक्त करण्याचा उपक्रम राबवित आहे. 3) तंबाखू नियंत्रण कक्ष (जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा) त्यात तंबाखु सोडण्यासाठी समुपदेशन केले जाते तसेच

 

जवळ तंबाखू बाळगल्यास व खातांना आढळल्यास त्यांच्याकडुन 200 रूपये चालान फाडल्या जाते.

 

 

 

वर्ष

 

चालानन करण्यात आलेल्या लोकांची संख्या

 

वसुल करण्यात आलेली रक्कम

 

2018-19

 

537

 

41072

 

2019-20

 

1215

 

56582

 

2020-21

 

20

 

2000

 

2021-22

 

232

 

25120

 

2022-23

 

681

 

106635

 

2023-24

 

41

 

1950

 

एकूण

 

2726

 

233359

 

 

 

तोंडाच्या कर्करोगाची सर्वसामान्य लक्षणे

 

1) तोंडाच्या पोकळीमध्ये पांढरा / लाल चट्टा

 

2) तोंडाच्या पोकळीमध्ये व्रण/ खडबडीत भाग, विषेषताः एक महिन्याहून अधिक काळ बरे झालेले नाहीत.

 

3) नेहमीपेक्षा तोंड उघडण्यास अवघड जाणे/ कमी उघडणे

 

4) जीभ बाहेर काढण्यास उवघड जाणे

 

5) आवाजामध्ये बदल (किनरा/घोगरा आवाज)

 

6) अति प्रमाणात लाळ सुटणे चावणे/गिळणे/ बोलण्यास अवघड जाणे.