28 मे 2023 पर्यंत जिल्ह्यात 37 कलम लागू

28 मे 2023 पर्यंत जिल्ह्यात 37 कलम लागू

 

भंडारा, दि. 18 मे : 14 मे रोजी संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे), 22 मे रोजी महाराणा प्रताप जयंती (तिथीप्रमाणे), 28 मे रोजी स्वा. सावरकर जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे. त्या निमीत्याने काही ठिकाणी मिरवणुक तर काही ठिकाणी महाप्रसादाकरिता गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

पावसाळी हंगामाकरिता शेतकऱ्यांना खते, रासायनिक औषधी स्वस्त दरात उपलब्ध करुन द्यावेत व त्यांचा पुरवठा नियमित करावा, पुर्नवसन, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच विविध मागण्यांना घेऊन राजकीय पुढारी मजुर वर्ग व शेतकरी वर्गाला हाताशी धरुन धरणे, मोर्चे, आंदालने, निदर्शने आयोजित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 14 ते 28 मे 2023 पर्यंत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी अर्चना यादव यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यातयेईल.