जे.एम.पटेल महाविद्यालय येथे आज छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

जे.एम.पटेल महाविद्यालय येथे आज छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

 

भंडारा : शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 16 मे रोजी सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत जे.एम.पटेल महाविद्यालय, राजगोपालाचारी वार्ड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन केले आहे.

 

या शिबिरामध्ये दहावी व बारावी नंतर काय? भविष्यातील शिक्षणात तसेच रोजगारांच्या व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नविन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगारांच्या संधी आदिबाबत सविस्तर मार्गदर्शन तज्ञांकडून करण्यात येणार आहे. तसेच रोजगार व स्वयंरोजगारासाठी, शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँका व वित्तीय संस्था, महामंडळे यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

 

तरी जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांना छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिरामध्ये सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्हि. एम. लाकडे यांनी केले आहे.