पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 10 व 11 मे रोजी आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 10 व 11 मे रोजी आयोजन

गडचिरोली, दि.08: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 व 11 मे 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे ठिक 10.00 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये नामंकित कंपन्या उपस्थित असणार असून उमेदवारांना लाभ घेण्यासाठी सदर रोजगार मेळाव्याकरिता असलेले इच्छुक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने, दि.10 व 11 मे 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे.