रब्बी पणन हंगाम 2022-23 साठी ऑनलाईन नोंदणी करीता मुदतवाढ

रब्बी पणन हंगाम 2022-23 साठी ऑनलाईन नोंदणी करीता मुदतवाढ

गडचिरोली,दि.03 : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी महामंडळ मर्यादित नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार आधारभुत किंमत खरेदी योजना रब्बी पणन हंगाम 2022-23 मध्ये शासन निर्णयानुसार धान विक्रीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन नोंदणी करिता दि. 15 मे 2023 पर्यंत मुदतवाढ दिलेली असुन ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झालेली नाही. अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणेसाठी स्वत: सातबारा व इतर आवश्यक दस्ताएवजासह आपल्या नजिकच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाचे खरेदी केंद्राशी संपर्क साधुन आपली नोंदणी करुन शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा असे उप प्रादेशिक व्यवस्थापक अहेरी (उच्च श्रेणी) बि.एस. बरकमकर यांनी कळविले आहे.