सामाजिक न्याय पर्व उपक्रमातंर्गत नागरी हक्क संरक्षण व ॲट्रॉसिटी कायदा कार्यशाळा

सामाजिक न्याय पर्व उपक्रमातंर्गत नागरी हक्क संरक्षण

व ॲट्रॉसिटी कायदा कार्यशाळा

 

चंद्रपूर,दि. 03 : समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अभिनव संकल्पनेतून संपुर्ण जिल्हयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, चंद्रपूर तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यावतीने सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी नागरी हक्क संरक्षण कायदा, अनुसूचित जाती व अनिसुचीत जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाला सहायक आयुक्त अमोल यावलीकर, अॅड. प्रिया पाटील, आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. राजेश दहेगावकर, सह.प्राध्यापक मिलिंद भगत, ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव झाडे आदींची उपस्थिती होती. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी अध्यक्ष म्हणून बोलताना ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत पिडीत लाभार्थ्याला व पिडीत कुटुंबाला समाजकल्याण विभागातर्फे प्रदान करण्यात येणारे विशेष सहाय्य, त्याचे स्वरूप याबाबत मार्गदर्शन केले.

 

अॅड. प्रिया पाटील यांनी “ॲट्रॉसिटी कायदा हे संरक्षणाचे अस्त्र ते जपून वापरा” तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अर्थात ॲट्रॉसिटी कायदा हा अनुसूचित जाती-जमातीचे संरक्षणासाठीचे शासनाने दिलेले अस्त्र असून त्याचा योग्य वापर केला जावा असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या समतापर्व अंतर्गतच्या ॲट्रॉसिटी कार्यशाळेत केले तसेच ॲट्रॉसिटी कायद्यातल्या तरतुदी व त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे संचालन सचीन फुलजले व आभार समाज कल्याण निरीक्षक पुनम आसेगावकर यांनी मानले.