कोतवाल पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

कोतवाल पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

भंडारा, दि. 2 मे, : भंडारा उपविभागातील रिक्त असलेली कोतवाल पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 2 मे 2023 ते 17 मे 2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. सविस्तर जाहिरात http://tahsilbhandara.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच विहित नमुन्यात फक्त ऑनलाइन पध्दतीने http://tahsilbhandara.in या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज करावा, असे उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष, कोतवाल पदभरती प्रक्रिया समिती रविंद्र राठोड यांनी कळविले आहे.