ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

भंडारा, दि. 31 : राज्य निवडणूक आयोग यांचे 30 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, आयोगाने 29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक रद्द केलेल्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून तो पुढील प्रमाणे आहे.

  विशेष ग्रामसभेची सूचना देणे (आरक्षणाची सोडत काढण्याकरिता) 3 जून 2022. विशेष ग्रामसभा बोलवून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला) 6 जून 2022. सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करणे 7 जून 2022. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 7 ते 10 जून 2022. उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देणे 15 जून 2022. उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे 17 जून 2022. जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) व्यापक प्रसिध्दी देणे 20 जून 2022.