आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – डॉ. दिप्ती सुर्यवंशी

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणानी सज्ज राहावे – डॉ. दिप्ती सुर्यवंशी

चंद्रपूर, दि. 26 : मान्सून पूर्व तयारीचा आराखडा तयार करणे व आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व यत्रंणेचा आढावा घेण्यात आला.

पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी आवश्यक उपायोजना कराव्यात व त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश डॉ. सुर्यवंशी यांनी दिले. यात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची डागडुजी, आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा व इतर सामग्री, नगर परिषदने नालेसफाई, ब्लिचिंग पाऊडर, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्ती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी स्वच्छ पाणीपुरवठा, पुरवठा विभागाने दरवर्षी पूर येणा-या गावांना दोन महिन्यांचे आगाऊ धान्य वाटप करण्याच्या सूचना तहसीलदार संजय राईंचवार यांनी दिल्या.

यावेळी प्रभारी ठाणेदार श्री. मुलानी, विस्तार अधिकारी अनिरुद्ध वाळके, नायब तहसीलदार सतीश साळवे, वनपरिक्षेत्राधिकारी संतोष थिपे यांच्यासह तालुक्यातील  बिल्ट, बामणी प्रोटिन्सचे प्रमुख, वेकोलीचे प्रतिनिधी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.