निवृत्तीवेतन धारकांकरिता 30 मे रोजी पेंशन अदालत

निवृत्तीवेतन धारकांकरिता 30 मे रोजी पेंशन अदालत

भंडारा, दि. 25 :  निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी तसेच महत्वाच्या सूचना जाणून घेण्याच्या अनुषंगाने 30 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय भंडारा येथे पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या पेंशन अदालतीसाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतन धारकांनी उपस्थित रहावे, असे जिल्हा कोषागार कार्यालयाव्दारे कळविले आहे.