तलाव /जलाशयावर नोंदणीकृत तलाव ठेका घेण्यास पात्र असणाऱ्या संस्थांबाबत आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन

तलाव /जलाशयावर नोंदणीकृत तलाव ठेका घेण्यास पात्र असणाऱ्या संस्थांबाबत आक्षेप असल्यास कळविण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 24 मे : शासन निर्णय दि. 3 जुलै 2019 नुसार मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारीसाठी हस्तांतरित केलेली तलाव / जलाशय ठेक्याने देण्याबाबतची कार्यवाही करावयाची आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, चंद्रपूर यांचे पत्र दि.2 मे 2022 अन्वये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) चंद्रपुर कार्यालयास ठेका मुदत संपणाऱ्या तलावाची यादी प्राप्त झाली आहे.

त्यानुसार संबंधित तलाव जलाशयावर नोंदणीकृत तलाव घेण्यास पात्र असणाऱ्या मच्छिमार सहकारी संस्थांची नावे असलेली यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय चंद्रपूर, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ब्रह्मपुरी, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी चंद्रपूर, जिल्हा परिषद चंद्रपूर, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पंचायत समिती, तसेच संबंधित संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संस्था तलाव, जलाशयावर नोंदणीकृत तलाव ठेका घेण्यास पात्र असणाऱ्या संस्थांबाबत आक्षेप असल्यास सदर यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत, दि. 27 मे 2022 पर्यंत जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी प्रशासकीय भवन, पहिला माळा या कार्यालयात सादर करावेत. विहित कालावधीनंतर प्राप्त आक्षेप विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची संबंधित संस्थांनी नोंद घ्यावी, असे सहाय्यक निबंधक डी.यु. शेगोकर यांनी कळवले आहे.