राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चु कडू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चंद्रपूर, दि. 15 मे: राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 17 मे 2022 रोजी रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह, राजुरा येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता पाटण ता. जिवती येथील कोलाम गुड्याकडे प्रस्थान. रात्री 9:30 वाजता पाटण ता. जिवती येथील कोलाम गुड्यावर आगमन व आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती, भोजन व मुक्काम.
बुधवार, दि. 18 मे 2022 रोजी सकाळी 8 वाजता पाटण ता. जिवती येथील कोलाम गुड्यावर कोलामांशी समस्यांवर चर्चा. सकाळी 9 वाजता गडचिरोलीकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथुन चंद्रपूरकडे प्रयाण. दुपारी 3:30 वाजता चंद्रपूर येथे कामगारांचा आनंद मेळावा. सायंकाळी 6:30 वाजता नागपूरकडे प्रयाण.