ब्रम्हपुरी येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

ब्रम्हपुरी येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

 चंद्रपूर दि. 12 मे: गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पांतर्गत गोसेखुर्द उजवा कालवा विभाग ब्रम्हपुरी, सायगाटा वसाहत येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी व उदघाटन पार पडले.

यावेळी नागपूर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, नामवंत कृषी व जल तज्ञ डॉ. सुधीर भोंगळे तसेच आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ व उपाध्यक्ष (टिश्यू विपणन) जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे डॉ. के. बी. पाटिल,  नागपुर, गोसीखुर्द प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. अंकुर देसाई, प्रकल्प समन्वयक मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनीक धोरण संस्थेचे प्रा. डॉ. सुरेश मैंद, नागपुर, विभागीय कृषी संचालक डॉ. रविंद्र भोसले प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी, सायगाटा वसाहतीत नव्याने तयार झालेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर प्रशिक्षण केंद्राचा लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन गोसेखुर्द उजवा कालवा ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप हासे यांनी केले. या कार्यक्रमाला ब्रम्हपुरी, सावली, मूल, नागभीड व  पवनी येथील गोसीखुर्द प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील  शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.