31 मे रोजी प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन

31 मे रोजी प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर दि. 12 मे: आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती संस्कृती जतन करण्याकरिता आजादी का अमृत महोत्सवानिमित्त प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर नृत्य स्पर्धा दि. 31 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपुर येथे होणार आहे. आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेला आदिवासी बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित राहून या नृत्य स्पर्धेचा लाभ घ्यावा. असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.