शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी 31 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी 31 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

भंडारा, दि. 11 : शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदविण्यासाठी आगामी  31 मे पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी केले आहे.

सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जाती, इमाव, विजाभज तसेच विमाप्र प्रवर्गातील प्रवेशित व भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून ऑनलाइन प्रणाली सुरु आहे. सर्व प्रवेशित व शिष्यवृत्तीस पात्र अनु.जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज महाडिबीटी प्रणालीवर नोंदविण्यासाठी 31 मे 2022 ही अंतिम मुदत असल्याने शिष्यवृत्तीस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज नोंदणी करावी. तसेच महाविद्यालय स्तरावरील अर्जांपैकी पात्र असलेले अर्ज अंतिम दिनांकाची वाट न बघता तात्काळ मंजूर करण्याचे आवाहन सुकेशिनी तेलगोटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी केले आहे.

सन 2021-22 या वर्षामधील एकूण 990 अर्ज आज रोजी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित दिसून येत आहेत.  दरम्यान अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज महाडिबीटी प्रणालीवर नोंदविण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदत दिली होती. अर्ज भरण्यास अडचणी येत होत्या, त्यामुळे अनु.जाती ला 7 मार्च तर विजाभज, इमाव व विमाप्र यांना अर्ज भरण्यासाठी 31 मार्च त्यानंतर वाढ करुन 30 एप्रिल देण्यात आली  होती. आता पुन्हा एकदा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात येऊन  ती  31 मे, 2022 पर्यंत केली आहे.

अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी पत्ता- कार्यालय, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, भंडारा दुरध्वनी क्र. 07184-295257 Email- acswobhandara@gmail.com वर संपर्क साधावा.