शासकीय अंध विद्यालय भंडारा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

शासकीय अंध विद्यालय भंडारा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

भंडारा, दि. 11 : अंध  व  अस्थिव्यंग मुलांसाठी शासकीय अंध विद्यालय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली  आहे. तरी इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी केले आहे.

 शासकीय अंध विद्यालय, स्टेशन रोड (जकातदार विद्यालयाजवळ) येथे शासकीय निवासी अंध शाळा आहे. यामध्ये वर्ग 1 ते 4 पर्यंत वयोगट 6 ते 14 मधील विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. तसेच वर्ग पाचवी ते दहावी पर्यंतच्या अंध व अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना सर्व सामान्य शाळेत शिक्षण घेता यावे म्हणून शाळेतील वसतिगृहात निवास व भोजन, शैक्षणिक साहित्य, गणवेश इत्यादी सोयी सवलती पुरविण्यात येतात. या शाळेत प्रवेशासाठी पुढील प्रमाणे पात्रता अपेक्षित आहे.

प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांचे वय सहा ते चौदा असावे. प्रवेशित विद्यार्थी हा अंध किंवा अस्थिव्यंग असावा. त्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दिव्यांगांचे कमीत कमी 40 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. इतर कोणताही आजार नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र  आवश्यक आहे. अधिक संदर्भासाठी संपर्क क्रमांक 9403416725 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाने केले आहे.