राष्ट्रीय लोक अदालतीत 1904 प्रकरणे निकाली Ø  साडेपाच कोटीपेक्षा जास्त तडजोड रकमेचा समावेश

राष्ट्रीय लोक अदालतीत 1904 प्रकरणे निकाली

Ø  साडेपाच कोटीपेक्षा जास्त तडजोड रकमेचा समावेश

चंद्रपूर दि. 9 मे:  जिल्हयात 7 मे रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये  1904 प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.  यात 5 कोटी, 73 लक्ष,  61 हजार, 832 रुपये तडजोड रकमेचा समावेश आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण यांच्या सुचनेनुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह सर्व तालुकास्तरीय न्यायालयामध्ये एकाच दिवशी घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयीन प्रलंबित  समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्याअगोदरची ( प्र‍ि-लीटीगेशन) प्रकरणे ठेवण्यात आली. या लोक अदालतीमध्ये न्यायालयीन प्रलंबित  833  आणि दाखलपूर्व 1071 असे एकूण 1904 प्रकरणे एकाच दिवशी निकाली निघाली. सदर प्रकरणांमध्ये एकूण साडेपाच कोटी रुपयांहून अधिक मुल्याच्या वादांबाबत तडजोड झाली. या लोक अदालतीमध्ये 16,610 प्रकरणे तडजोडीने  व सांमजस्याने  निकाली काढण्यासाठी  ठेवण्यात आल्या होत्या. तर मुख्य न्यायदंडाधिकारी आस्थापनेद्वारा 346 प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये 4 प्रकरणांचा यशस्वी समझोता झाला. त्यासाठी जिल्हा आयोगाचे अध्यक्ष अतुल आळशी, आयोगाच्या सदस्या कल्पना जांगडे (कुटे), किर्ती वैद्य (गाडगील) यांचे सहकार्य लाभले. वरील सर्व आकडेवारी विचारात घेता या लोक अदालतीच्या माध्यमातून  एकुण 2250 प्रकरणे निकाली निघाली. या राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता अग्रवाल, न्यायाधीश सर्वश्री विरेंद्र केदार, प्रभाकर मोडक, एस. एस. मौदेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रशांत काळे व मुख्य न्यायदंडाधिकारी शिवनाथ काळे यांनी सहकार्य केले.

लोक अदालतीत प्रकरणांचा निपटारा करण्याकरीता जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.एस. अन्सारी, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एम.ए. शिलार, ए. डी. रामटेके, एम. एस. काळे व कामगार न्यायालयाच्या  न्यायाधीश आर. व्ही. मेटे, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. के. गोटे, एन.ए. मोर व एस. मुक्कनवार यांनी पॅनेल न्यायाधीश म्हणून यशस्वीपणे काम  पाहिले. सदर लोक अदालतीसाठी चंद्रपूर जिल्हा विधीज्ञ मंडळाचे  विधीज्ञ, जिल्हा न्यायालयाचे कोर्ट मॅनेजर सुशील भाले, प्रबंधक श्री. अंबारे, सहायक अधिक्षक प्रकाश पायतोड आदी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक बी.पी. राखुंडे, वरिष्ठ लिपिक राजेश वेरुळकर, कनिष्ठ लिपिक लक्ष्मीकांत उराडे, अनुरोध रोघे, पद्माकर सोनकुसरे, प्रमोद पदलमवार, राकेश चहारे यांनी परिश्रम घेतले.