अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आवाहन

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज

तात्काळ निकाली काढण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 9 मे: सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे बऱ्याच प्रमाणात शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ निकाली काढण्याकरिता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडून वारंवार कळविण्यात आले होते. अनुसूचित जातीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी व शिष्यवृत्तीपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे  प्राचार्यांनी नोंद घ्यावी.

त्याकरिता सर्व महाविद्यालयांनी त्या-त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कॅम्प घेऊन सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जाची तपासणी करून सदर अर्ज तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, चंद्रपूर या विभागाला फॉरवर्ड करावेत. जेणेकरून अनुसूचित जातीचा कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही. असे आवाहन  समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.