बँक ऑफ इंडियाच्या वतीने एक्सपोर्टर्स मीटचे आयोजन

बँक ऑफ इंडियाच्या वतीने एक्सपोर्टर्स मीटचे आयोजन

चंद्रपूर दि. 9 मे: बँक ऑफ इंडियाच्या वतीने एन.डी.हॉटेल, चंद्रपूर येथे एक्सपोर्टर्स मीटचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बँक ऑफ इंडिया विदर्भ झोनचे प्रबंधक तुषार हाटे, अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे, मुख्य प्रबंधक सम्राट वर्मा तसेच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून 30 एक्सपोर्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते.

बँक ऑफ इंडिया विदर्भ झोनचे प्रबंधक तुषार हाटे यांनी जिल्ह्यातील एक्सपोर्टर्सना संबोधित केले व म्हणाले,  बँक ऑफ इंडिया ग्राहकांना भारतात आणि विदेशात सुद्धा विविध सेवा पुरविण्यात नेहमीच अग्रेसर आहे. बँक ऑफ इंडियाच्या विविध देशात 45 शाखा आणि 250 पेक्षा जास्त करस्पाँडंट बँक अविरत सेवा देण्यास कटिबद्ध आहे.

सम्राट वर्मा यांनी बँक ऑफ इंडियाच्या एक्सपोर्टर्ससाठी असलेल्या विशेष योजनांची माहिती देऊन ग्राहकांना जास्तीत जास्त प्रमाणात निर्यात करण्याचे प्रोत्साहन दिले, आणि बँक ऑफ इंडियाच्या विशेष योजनांचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वाढविण्याचे आवाहन केले. तर चंद्रपूर जिल्ह्यात बँक ऑफ इंडिया, अग्रणी बँक असून नेहमीच ग्राहकांना आवश्यकतेनुसार सेवा पुरवण्यात कटिबद्ध असेल असे आश्वासन जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक प्रशांत धोंगडे यांनी दिले.

कार्यक्रमाचे संचालन मनोजीत जैन यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सेवानिवृत्त मुख्य प्रबंधक डी.डी. नंदनवार, वरिष्ठ प्रबंधक (मार्केटिंग) अतुल साळवे, बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.