कामगार योजनांचा सचेतना कार्यक्रम साजरा

कामगार योजनांचा सचेतना कार्यक्रम साजरा

भंडारा, दि.05: दिनांक 1 मे 2022 रोजी सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालय,भंडारा यांच्याकडून 75 व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांअतर्गत 1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्य ग्राम गणेशपूर येथील  ग्रामपंचायत कार्यालय, गणेशपूर ता. जि. भंडारा येथे “कामगार योजनांचा सचेतना कार्यक्रम साजरा” करण्यात आला असून  भंडारा जिल्ह्यातील कामगारांना  विविध  कामगार कायदे व कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, घरेलू मंडळाच्या  विविध कल्याणकारी योजना, नोंदणी व नुतनीकरण व लाभाबाबतची तसेच असंघटित क्षेत्रात कार्यरत सर्व कामगारांकरिता राबवण्यात येत असलेल्या ई-श्रम पोर्टल  बाबत माहिती देऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले  उपस्थित काही बांधकाम कामगारांना  स्मार्ट कार्ड व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना ई-श्रम कार्ड चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मानिष गणविर, सरपंच, ग्रा.पं.गणेशपूर, कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून यशवंत सोनकुसारे, जि. प.सदस्य, सौ.किर्ती गणविर, पं.सं.सदस्य,गणेशपूर, प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . तरी  उपस्थित कामगारांना विविध योजनांची माहिती  व मार्गदर्शन          गु. रा. पंधरे, सरकारी कामगार अधिकारी, भंडारा यांनी केले. सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सदरहू कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यालयातील कर्मचारी डि. बि. चौरे व आभार प्रदर्शन नि. सं. कुंभलकर यांनी केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.